मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची स्थगित केलेली सेवा पुर्ववत सुरु झाली असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनानं दिली आहे.

याआधी खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरची उड्डाणं संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्थगित केली होती, मात्र संध्याकाळी ६ वाजल्यापासून सेवा पुर्ववत सुरु झाली आहे.ता ही सेवा सुरु झाली.