नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट नं आपल्या रुग्णालयाची पुनर्रचना केली आहे. आपले कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १०० खाटांची सोय असलेल्या या रुग्णालयानं, १२० कोरोबाधित आणि २५ कोरोनाबाह्य रुग्णांवर उपचारांची सोय केली आहे.
लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या रुग्णालयात ३३३ कोरोनाबाधितांवर उपचार झाले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती, अध्यक्ष संजय भाटिया यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.