नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्वरित मात करून उत्तम फलनिष्पत्ती देणारे अल्प मुदतीचे प्रकल्प आखण्याच्या दृष्टीनं, देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत, नीती आयोग शिफारशी करणार आहे.

आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत, यांनी आज ही माहिती दिली. ते पी टी आय, या वृत्तसंस्थेशी बोलत होते. त्यासाठी वैज्ञानिक आणि वैज्ञानिक संस्था यांच्याशी सल्लामसलत सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. एखाद्या प्रकल्पावर चार-पाच वर्ष काम करूनही जर त्यातून काहीच निष्पन्न होणार नसेल तर काहीच उपयोग नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. सारस्वत हे, डी आर डी ओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत.