नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर हायवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हे सर्वजण, काम मिळत नसल्याने आपल्या गावी परतणारे, स्थलांतरित मजूर असावेत, असा अंदाज आहे. विरार पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.