नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हात स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या हॅण्ड सॅनिटायझर चा तुटवडा लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीचा परवाना दिला आहे.
त्यामध्ये कळंब तालुक्यातील रांजणी इथल्या नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज त्याचप्रमाणे गौरगाव इथल्या इडलर्स बायो एनर्जी लिमिटेड आणि लोहारा तालुक्यातील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.