नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तुंची विक्री करतांना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रिम भाववाढ करु पाहणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पथकं नेमण्यात आली आहेत.

या पथकांनी आज ३७ दुकानांवर छापे घालत २ दुकाने सील केली आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ही माहिती दिली.