नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात लागू असलेल्या  संचारबंदीचा  कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही असं आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी स्पष्ट केलं.

संचारबंदीचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याची  चर्चा आणि बातम्या या निरर्थक आहेत ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन  गौबा यांनी ट्विटरवरून केलं आहे.