मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहणी करुन नुकसानीचा आज आढावा घेतला. कोकणवासीयांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. २ दिवसात पंचनामे पूर्णकरुन मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
नुकसान भरपाईसाठी केंद्रसरकारचे निकष लावून कोकणवासीयांना मदत करु. असे सांगून ठाकरे म्हणाले की, पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती पुर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
तौक्तेवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच आढावा घेण्यासाठी त्यांनी आज सकाळीरत्नागिरीत बैठक घेतली. पालकमंत्री अनिल परब, उच्च आणितंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायणमिश्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
जिल्ह्यातल्या २ तालुक्यांनावादळाचा फटका सर्वात जास्त बसला असून घरे, फळबागा आणि पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. याबाबतची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातल्या कोविड विषयक कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
जिल्हा पोलिसांतर्फे उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड केअर सेंटरचे ई-उद्घाटनही केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालवणला भेट दिली. किनारपट्टीच्या भागात कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे असून त्याकरता केंद्रसरकारने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कोविडशी सामना करत असताना नवीन ऑक्सीजन प्लान्ट तयार करण्यात येत असून बेड्सची संख्याही वाढवण्यातयेत आहे, असं त्यांनी सांगितलं. लसीकरणानंतरही मास्क वापरणं गरजेचंच असून नियमपाळले तरच नुकसान कमी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.