नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात दुर्लक्ष केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात  आला आहे.

दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर गृह विभागाचे अतिरिक्त सचिव आणि दिल्लीच्या सलीमपुरच्या  उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस गृह मंत्रालयानं बजावली आहे.