नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या आठवड्यात मोठ्यातेजीत असलेले देशातले शेअर बाजार आज पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरले. सेन्सेक्स आज १हजार ३७५ अंकांनी कोसळून २८ हजार ४४० अंकांवर बंद झाला. निफ्टी ३७९ अंकांनी कोसळून८ हजार २८१ अंकांवर स्थिरावला.

वित्त आणि बँकिंग सेवा क्षेत्रासह वाहन उद्योगातलेसमभाग आज मोठ्या प्रमाणात कोसळले.

जगभरात मंदीची सुरुवात झाल्याची आंतरराष्ट्रीयनाणेनिधीने केलेली घोषणा आणि कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या वाढत असलेल्याधोक्यामुळे बाजाराने गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पॅकेजकडेदुर्लक्ष केल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.