नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २१ हजारापेक्षा जास्त मदत शिबीरं सुरु केली आहेत. त्यात ६लाख लोकांना आश्रय मिळू शकतो, असं केंद्रीय गृह खात्याच्या सहसचिव पुण्यसलील श्रीवास्तव यांनी सांगितलं.
२३ लाख लोकांना अन्न पुरवण्याची सुविधा उभारली असून याचा लाभ गरीब, स्थलांतरित मजूर, आणि इतर गरजूंना मिळेल, असं त्यांनी सांगितलं.