नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.
केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपआपल्या स्तरावरही यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन गृहमंत्रालयानं केलं आहे.