पुणे : पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येवू नये, यासाठी तसेच इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून 02026123371 /1077 टोल फ्री नंबर आहे. (नियंत्रण कक्ष 24 X 7 कार्यरत आहे. ) त्यावर कोरोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय प्रभावीत झाल्यामुळे कामगार विस्थापित / बेरोजगार व परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या तक्रारीबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. सदर कक्षाचे फोन नंबर 02026111061 व मोबाईल नंबर 7517768603 असा असून या नंबरवर कामगारांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. या तक्रारीबाबत उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष 020-29706611 स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी विजय गायकवाड, सहायक आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरीकांना तसेच कामगार, मजूर व इतर कुठल्याही तक्रारीसाठी या नियंत्रण कक्षाकडे तक्रार देता येईल. या तक्रारीचे तात्काळ निरसन व अंमलबजावणी नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयाने नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे.
‘लॉकडाऊन’मुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम साईट्सवर अडकलेल्यास मजुरांना एक वेळचे भोजन देण्या्त येत आहे. जिल्हााधिकारी नवल किशोर राम यांनी कामगार विभागाच्याह मदतीने ही सोय केली. ‘क्रेडाई’ या संस्थेाकडे उपलब्ध असलेल्याा आकडेवारीनुसार तसेच बांधकाम मंडळाकडे नोंद असलेल्या मजुरांना अटल आहार योजनेंतर्गत माध्यासन्हय भोजन देण्यारची योजना आहे. जिल्हाबधिकारी राम यांच्याल निर्देशानुसार बांधकाम साईट्सवरील सर्वच मजुरांना भोजन देण्याकत येत आहे.
उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर व तहसिलदार सुनील कोळी यांच्या उपस्थितीत पाषाण भागातील सुतारवाडी येथील 250 कुटुंबांना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 किलो खाद्यतेल, 1 किलो दाळ, 1 किलो मीठ, हळद, जिरे मसाल्याचे 1 पाकीट वाटण्यात आले. वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. वाटप करण्यात आलेले साहित्य साधारणपणे 10 दिवस इतके पुरेल. आवश्यकतेनुसार पुन्हा वाटप करण्यात येईल.
पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून वॉर्ड ऑफीसरच्या मदतीनेही भोजन तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. प्रशासन जनतेच्या समस्यांबाबत संवेदनशील असून कोणतीही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.