नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंदच्या काळात गोव्याहून रायगड जिल्ह्यात कोलाड इथं अवैधरित्या  दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा एक ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी आज पहाटे खारेपाटण इथं ताब्यात घेतला.

या ट्रकच्या हौद्यात दारुची १८ खोकी सापडली असून त्यांची किंमत ७५ हजार ६०० रुपये इतकी आहे.

या दारूसह ४ लाख २५ हजार ६०० रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीसांनी सांगितलं.