नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातल्या ५० कोटींहून अधिक गरीबांना याचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत सर्व चाचण्या आणि उपचार मोफत होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

या योजनेअंतर्गत देशभरातल्या पात्र लाभार्थ्यांसाठी खाजगी प्रयोगशाळांमधली चाचणी तसंच मान्यताप्राप्त रुग्णालयांमधले उपचार मोफत केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोविड१९ विरुद्धच्या लढ्यात, खाजगी प्रयोग शाळा आणि रुग्णालयांनी मोठ्या संख्येनं पुढे यावं, तसंच खाजगी क्षेत्रानं एखाद्या भागिदाराची भूमिका बजावावी असं आवाहनही हर्षवर्धन यांनी केलं आहे.