नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियाला पाठविण्यात येत असलेल्या मदत सामुग्रीच्या विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागानं केलेल्या चौकशीत हे लोक आढळून आले.

नवी दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र ही माहिती त्यांनी लपवून ठेवली होती.

दरम्यान दिल्लीत आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज याठिकाणाला भेट दिली. याठिकाणच्या धर्मगुरूवर आणि याठिकाणी आलेल्या काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.