नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गांधीनगर येथील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी या दोन आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर आयएनआर-यूएसडीफ्युचर्स आणि ऑप्शन्सकॉन्ट्रॅक्ट्स सुरू केले.
गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळापूर्वी भारताशी संबंधित वित्तीय सेवांमधील महत्त्वपूर्ण बाजार हिस्सा अन्य आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रांमध्ये गेला आहे. हा व्यवसाय भारतात आणणे भारतातील आर्थिक घडामोडी आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने फायदेशीर आहे. जीआयएफटी-आयएफएससीमधील एक्सचेंजमध्ये आयएनआर-यूएसडी काँट्रॅक्ट्सची सुरुवात हे या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. जीआयएफटी -आयएफएससीमधील जगभरातून सहभागी झालेल्यांसाठी आयएनआर-यूएसडी काँट्रॅक्ट्स दिवसाचे 22 तास उपलब्ध असेल.
जीआयएफटी-आयएफएससी येथील जागतिक दर्जाचे व्यवसाय वातावरण आणि स्पर्धात्मक कर पद्धतीच्या पार्श्वभूमीवर भारतात आयएनआर-यूएसडी काँट्रॅक्ट्सच्या व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आयएफएससीच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात जागतिक सहभाग वाढेल तसेच भारताचे आयएफएससी जागतिक स्तरावर जोडले जाईल.