नवी दिल्ली : युवा आणि क्रीडा मंत्रालयाची खेलो इंडिया योजना देशात यशस्वीरित्या सुरु आहे.
सुधारित अंदाजानुसार 2018-19 या वर्षात खेलो इंडिया योजनेसाठी 500.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 2018-19 या वर्षात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 199.31 कोटी रुपये वितरित करण्यात आले. महाराष्ट्राला 19.87 कोटी रुपये वितरित करण्यात आले.
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजीजू यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.