पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडॉऊन कालावधीत निवारा केंद्रातील कामगार, गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना ब्रिटानिया कंपनीच्या बिस्कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी 1 लाख 50 हजार, सातारा जिल्ह्यासाठी 25 हजार आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 55 हजार बिस्कीटाचे पुडे प्राप्त झाले असून वितरणाचे काम चालू आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी 95 हजार आणि सांगली जिल्ह्यासाठी 35 हजार बिस्कीट पुडे प्राप्त होणार असून प्राप्त होताच वितरणाचे नियोजन करण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बिस्कीट वाटपासाठी जबाबदार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.