नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या  वुहान मधली 73 दिवसांची टाळेबंदी आज उठवल्यानंतर वुहान मधल्या हजारो नागरिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या मुख्य भागात परदेशाहून आलेले आणि स्थानिक असे मिळून 62 नवीन रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. याबरोबरच काल चीनमधल्या नवीन रुग्णांची संख्या 1 हजार 42 वर पोचली आहे.

आतापर्यंत चीनमधल्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 81 हजार 802 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 3 हजार 333 वर पोचली आहे. 77 हजार  279 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 1 हजार 95 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.