नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी थांबवण्याचा  इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना केवळ चीनकडे लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चीन मधून येणारी हवाई वाहतूक थांबवण्याबद्दल केलेल्या सूचनेला जागतिक आरोग्य संघटनेने  विरोध दर्शविल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.