नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या साथीमुळे येणाऱ्या काळात जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होऊ शकेल, असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. या मंदीमुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, पर्यटनावर झालेला परिणाम आणि अनेक देशांमध्ये असलेल्या संचारबंदीमुळे जागतिक स्तरावर मागणीमध्ये घट होण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी संचारबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसून येईल. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात हा परिणाम जाणवेल.