नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी डी ई, जी दक्षिण आणि के पश्चिम या चार प्रभागांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबचा वापर करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा विचार आहे.
धारावी परिसरात कोविड १९च्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने या परिसराची पाहणी केली. दरम्यान मुंबई पोलिसांनी सतरा लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे 57 हजार 500 मास्क भायखळा इथून जप्त केले आहेत. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.