नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूकपणे अपलोड करण्याचं काम मिशन मोडवर पूर्ण करा, असे निर्देश सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे योजना अंमलबजावणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक मशीनवर ठसे उमटत नाहीत त्यांची माहिती व्यक्तीचलित प्रक्रियेतून पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. यावेळी  पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या योजनेची प्रगती संदर्भात माहिती दिली.