मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यातल्या जिल्ह्यांमधल्या कोविड१९च्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार, जिल्ह्यांची विभागणी लाल, केशरी आणि हिरव्या अशा तीन क्षेत्रांमध्ये केली आहे. जिथे १५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत असे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, आणि सांगली हे जिल्हे लाल क्षेत्रात आहेत.
१५ पेक्षा कमी रुग्ण असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश केशरी रंगाच्या क्षेत्रात केला आहे.
तर जिथे एकही रुग्ण नाही, असे जिल्हे हिरव्या या सुरक्षित क्षेत्रात असून, त्यात धुळे, नंदूरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.