मुंबई (वृत्तसंस्था) : टाळे बंदीच्या काळात अनेकजण प्रसिद्धीच्या हव्यासापायी अन्नधान्य, जेवणाची पाकीट तसंच अन्य मदत देत असतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते माध्यमांवर पोस्ट करतात.
यातून गरीब, गरजूंचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन अशा आशयाचे फोटो अथवा व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करणाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, असं परिपत्रक लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जारी केलं आहे.