नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दृष्टा समाज सुधारक, शिक्षणतज्ञ, विचारी न्यायशास्त्री, विद्वान अर्थतज्ञ, उत्तम राजकारणी तसेच कायदेविषयक तज्ञ म्हणून सतत देशाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी तळमळीने कार्य केले, असे राष्ट्रपतींनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.

सामाजिक समता आणि एकोपा असेल अशा समाजाचे स्वप्न त्यांनी पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य देश आणि समाजासाठी अर्पण केले. त्यांनी देशाला दिलेली राज्यघटना इतकी प्रागतिक आणि सर्वसमावेशक आहे की त्यातील बारकाव्यांमुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतीय नागरिकांचा राज्यघटनेवरील विश्वास अधिकाधिक दृढ होतो आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी डॉ. आंबेडकर यांचा गौरव केला आहे.

आंबेडकर जयंतीच्या प्रसंगी, आपण सर्वांनी आंबेडकरांचे उच्च विचार, संघर्ष आणि उत्तम विचारांतून प्रेरणा घेत त्यांची शिकवण तसेच त्यांचे आदर्श यांना आपल्या जीवनात अनुसरण्याची शपथ घेऊया आणि त्याद्वारे मजबूत आणि समृद्ध भारताच्या उभारणीत सहभागी होऊया, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मात्र, त्याचसोबत, देशभरात सध्या पसरलेली कोविड-१९ विषाणूची साथ लक्षात घेऊन, यावर्षी प्रत्येकाने योग्य

सामाजिक अंतर राखून आणि आपापल्या घरी राहूनच डॉ. आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशातून केले आहे.

राष्ट्रपतींचा शुभेच्छा संदेश हिंदी भाषेतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा: