पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये व् कोरोना विषाणू (कोव्हीड-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्यामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग अनुषंगाने विविध आदेश पारीत करण्यात आले होते. तथापि, लॉकडाऊन बाबत राज्यात सुधारित घोषणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोरा राम यांनी प्राप्त अधिकारानुसार पुणे जिल्ह्यामध्ये यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे. या आदेशाचे व्यक्तींनी/ नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राम यांनी कळविले आहे.