नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. काही संस्थांनी असा तगादा लावल्याचं दृष्टीला आलं आहे, त्यामुळे शुल्क भरण्यासाठीच्या या मुदतवाढीबाबतची माहिती या सर्व महाविद्यालयं आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करावी, तसंच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळवावी, असं मनुष्य बळ विकास मंत्रालयानं कळवलं आहे.

अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचं या काळातलं वेतन दिलं जाईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. चालू सत्रासाठी संचारबंदीच्या काळात ऑनलाईन वर्ग चालू राहतील, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.