बँक्वेटचं रुपांतर कमुनिटी किचनमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर वरळीतल्या ब्ल्यू सी बँक्वेटतं रुपांतर कमुनिटी किचनमध्ये  केलं आहे. टाळेबंदी सुरु झाल्यापासून २४ तास हे किचन  २ पाळ्यांमध्ये सुरु आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी अंधेरी, वरळी आणि मुख्य टपाल कार्यालय मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत रोज २५ हजारपेक्षा जास्त लोकांना दोन वेळचं जेवण तयार करून बेस्टमार्फत पोचवलं जात. युवा, प्रोजेक्ट मुंबई, रोटरी क्लब ऑफ क्वीन नेक्लेस, आदी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी, शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय सेवा, बेस्ट, पोलीस, वाहतूक पोलीस आदींसह मजूर आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांनाही रोज जेवण दिलं जातं
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत घरपोच तांदूळ
नांदेड जिल्ह्यातल्या संगरोली तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ लाभार्थ्यांच्या घरी पोचवला जात आहे. संगरोली गावचे सरपंच व्यंकट पाटील यांनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवला, तसंच इतरही विक्रेत्यांनी सरकारच्या आदेशाची वाट न बघता लाभार्थ्यांना घरपोच तांदूळ पोचवावा, असं आवाहन केलं.
महिला बचत गटांनी बनवले मास्क
कोविड-१९  विरोधातल्या लढाईत लातूर इथले महिला स्वयंसहाय्यता गटही सहभागी झाले आहेत. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कची वाढती मागणी लक्षात घेऊन  वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले ६५ स्वयंसहाय्यता गट मोठ्या प्रमाणात  चांगल्या प्रतीचे  मास्क बनवत आहेत.   महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत या गटांनी आतापर्यंत साडे तीन लाख मास्क बनवले असून, यात ६०० महिलांचा सहभाग आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती आणि विक्री करणारा लातूर  हा राज्यातला  पहिला  जिल्हा ठरला आहे.
पोलीसांसाठी व्हॅनिटी व्हॅन
टाळेबंदीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी, अपुऱ्या सोयी असूनही कर्तव्य बजावत आहेत. अशा पोलिसांना निवारा आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं मुंबईतल्या अभिनेत्यांना व्हॅनिटी व्हॅन्स पुरवणाऱ्या केतन रावल यांनी त्यांच्या १३ व्हॅनिटी व्हॅन्स पोलिसांच्या सोयीसाठी तात्पुरत्या दिल्या आहेत. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन खोल्या, स्वच्छतागृह, झोपण्याची सोय आहे. त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्याची भावना लिशेषतः महिला पोलिस व्यक्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.