नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाबा आमटे यांचे अनुयायी आणि सिंधुदुर्ग इथं उभारलेल्या वसुंधरा विज्ञान संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी उर्फ सी. बी. नाईक यांच आज पहाटे मुंबईत निधन झालं.  ते ८४ वर्षांचे होते.

बाबा आमटे यांच्या १९८५ च्या काश्मीर ते कन्याकुमारी आणि १९८९ च्या अरुणाचल ते ओखा या भारत जोडो यात्रेत त्यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली. १९९१ मध्ये त्यांनी गोव्यात स्वतंत्ररित्या भारत जोडो अभियानाच आयोजन केलं होत.

१९९५ मध्ये त्यांनी वसुंधरा विज्ञान संस्था स्थापन करून ग्रामीण भागात विज्ञान प्रयोगशाळा नसलेल्या  ठिकाणी फिरत्या प्रयोगशाळेद्वारे खेड्यातल्या मुलांना मोफत विज्ञान शिक्षण दिलं.