नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संसर्गानं मुंबईतील अनेक विकास कामं रखडली आहेत. मात्र पावसाळा अवघ्या दीड महिन्यावर आला असल्यानं रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना आता वेगाने सुरुवात होणार आहे.
टाळेबंदीमुळे काही कामं ठप्प आहेत तर खोदून ठेवलेली कामं अपूर्णावस्थेत आहेत ,रस्ते मोकळे असल्यामुळे रस्त्यांची कामं वेगाने करता येतील असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे.