मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 175 आणि परराज्यातील 639 अशा एकूण 814 जणांना निवारागृहात ठेवण्यात आले आहे. यामध्ये सर्वात जास्त कर्नाटकातील 246 जणांचा समावेश आहे. निवारागृहांमध्ये सकाळी नाश्ता, चहा, दुपारी जेवण सायंकाळी चहा, बिस्कीट अथवा फळे आणि रात्री जेवण अशा सुविधा पुरविण्यात येत आहेत. ज्यांची निवाऱ्याची सोय आहे, परंतु जेवणाची सोय नाही, अशांसाठी जिल्ह्यात 23 कम्युनिटी किचनची सोय करण्यात आली आहे. या निवारागृहांमधील सोयीने कामगार, मजूर सुखावले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 22 परराज्यातील 6 अशा 28 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील 9 अशा 29 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 7 परराज्यातील 11 असे एकूण 18 असून याची क्षमता 25 जणांची आहे.

करवीर – सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 34 एकूण 36 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी – राज्यातील 9, परराज्यातील 35 असे एकूण 44 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे. कागल – जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 36 परराज्यातील 200 असे एकूण 236 जण असून क्षमता 250 जणांची आहे.

हातकणंगले – घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील 1 परराज्यातील 85 असे एकूण 86 जण असून क्षमता 100 जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 104 असे एकूण 106 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 39 परराज्यातील 8 एकूण 47 जण असून क्षमता 55 जणांची आहे.

शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17 असे एकूण 30 असून क्षमता 50 आहे. जैन सांस्कृतिक भवन कुरूंदवाड येथे राज्यातील 1 परराज्यातील 6 एकूण 7 क्षमता 50 आहे. उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे परराज्यातील 27 एकूण 27 क्षमता 50 आहे.

गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 5 एकूण 5 असून क्षमता 24 जणांची आहे.

गगनबावडा – माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यातील 13 जण असून क्षमता 20 जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण 102 असून क्षमता 105 जणांची आहे.

यामध्ये कर्नाटकातील 246,

तामिळनाडू 206,

राजस्थान 86,

मध्यप्रदेश 47,

उत्तर 30,

केरळ 8,

पाँडेचरी 1,

पश्चिम बंगाल 1,

आंध्रप्रदेश  3,

झारखंड  5,

बिहार 2,

हरियाणा 4

अशा एकूण 12 राज्यातील 639 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 175 असे मिळून 814 जणांचा समावेश आहे.

लोणार वसाहत येथील रामकृष्ण हॉलमधील काही कामगारांनी दिलेल्या प्रतिक्रिया –

1) अंबाजी वरंबल – गडहिंग्लज जवळील हसूरवाडी हे माझं गाव आहे. कामानिमित्त भाग्यलक्ष्मी या हॉटेलवर आलो होतो. सध्या संचारबंदीमुळे इथे आहे. इथे रहायची, जेवणाची सोय व्यवस्थित आहे. त्याचबरोबर चहा, बिस्कीट, फराळ, केळीही दिली जातात.

2) धनपाल गणपती सोळांकुरे- बॉक्साईटच्या कामासाठी मुंबईला दोन-तीन महिने गेलो होतो. इथे आल्यानंतर आजारी पडलो. बरे वाटल्यानंतर इथे सध्या ठेवले आहे. जेवणा खाण्याची सर्व सोय आहे.

3) रघुनाथ इतुपे–  कर्नाटकातील हुबळी हे माझे आहे. कामानिमित्त आलो होतो. चांगल्या पद्धतीने इथल्या कामगांराची सोय केली आहे.