नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या न्यायवृंदाने घेतलेल्या निर्णयात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बिश्वनाथ सोमाडेर यांना मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली.
मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद रफिक यांची ओरिसा उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारसही करण्यात आली.