नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपल्या एफ डी आय अर्थात थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा घेतला आहे. भारतीय कंपन्यांचं विलीनीकरण तसच संपादन रोखण्यासाठी या फेरआढाव्यात तरतूदी  केल्या आहेत. यानुसार सीमेपलिकडच्या देशातल्या कंपन्या केवळ सरकारच्या परवानगीनंच भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

नवीन धोरणानुसार भारतीय कंपन्यांच्या मालकी हक्कात बदल अथवा हस्तांतरणही यापुढे केवळ सरकारच्या परवानगीनंच होऊ शकेल. काँग्रेसनं सरकारच्या या नवीन धोरणच स्वागत केल आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय कंपन्यांचे मालकीहक्क कायम राखायच्या उद्देशानं केलेल्या सूचनेला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आनंद व्यक्त केला आहे.