नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १४ हजार ८४९ नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत या कोरोनामुळे, एक लाख ५३ हजार ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १७ हजार १३० रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत १ कोटी ३लाख ८३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ८४ हजार ४०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान राज्यात काल ३ हजार ६९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख १० हजार ५२१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल २ हजार ६९७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या २० लाख ६ हजार ३५४ झाली आहे. सध्या राज्यभरात ४३ हजार आठशे सत्तर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ५६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे ५० हजार ७४० रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे.
काल राज्यात सर्वाधिक २३ मृत्यूंची नोंद मुंबई – ठाणे विभागात झाली. पुणे विभागात काल २० मृत्यू नोंदवले गेले. नाशिक विभागात ६, नागपूर विभागात ४, औरंगाबाद विभागात २, आणि लातुर विभागात काल एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोल्हापूर आणि अकोला विभागात कालच्या दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही.