नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने वित्तीय वर्ष २०१९-२०२० च्या कर परतावा अर्जात सुधारणा केली असून या महिन्याच्या अखेरीस हा अर्ज उपलब्ध होईल. कोविड -१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राने विविध प्रकारच्या करसवलतींसाठी जूनपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी ही सूट देण्यात आली आहे.