नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रोक्सि क्लोरोक्विन या औषधाचं सेवन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पोटदुखी, अस्वस्थता आणि शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्याचे त्रास दिसून आले आहेत, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.

त्रास होत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २२ टक्के कर्मचाऱ्यांना मधुमेह, रक्तदाब तसंच हृदयाशी आणि श्वसनाशी संबंधित आजार असल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या औषधाच्या परिणामांचा अभ्यास सुरु असल्याचंही परिषदेनं म्हटलं आहे.