नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून विलगीकरण केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
कासा इथल्या उपजिल्हा रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी आणि उपचार घेत असलेले रुग्ण असे एकूण १८७ जण विलगीकरण केले होते. त्यांपैकी २४ जणांनी अंधाराचा फायदा पलायन केलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.