नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे.

ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही विशेष पार्सल गाडी येत्या गुरुवारी कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात हा आंबा घेण्यासाठी थांबणार आहे.