नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य विभागाने  ठाणे जिल्ह्याचा समावेश  हॉटस्पॉट मध्ये केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानं वगैरेंना पूर्वी असलेली सूट मात्र कायम राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं काही नियमवाली तयार करुन आज बाजार समितीतं सौदा पुकारुन बाजाराला सुरुवात केली आहे. एका दिवशी फक्त ५० वाहनं, एकाच वाणाची खरेदी-विक्री आणि एका वाहनात चालकासह एका शेतकऱ्याला बाजार समितीच्या आवारात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे  कोरोना बाधित आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातून येणारा भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्यांना अजूनही जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.