नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कच्च्या तेलाचे कमोडिटी बाजारातले दर शून्याखाली राहिल्यानं या क्षेत्रापुढची चिंता वाढली आहे. काल हा दर सुमारे उणे ४० पर्यंत घसरला. त्यामुळे मे महिन्यात पुरवठा होणाऱ्या तेलाचा दर प्रतिबॅरल उणे २ डॉलर ५८ सेंट्सवर आला.

ब्रेंटच्या व्यवहारांचे दर जूनमधल्या पुरवठ्यासाठी ३ डॉलर २२ सेंट्सनी घसरले. कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीवर निर्बंध आल्यानं तेलाच्या मागणीत अंदाजे ३० टक्के घसरण झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त तेलाच्या साठवणुकीची गरज निर्माण झाली आहे.