पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 890 झाली असून विभागात 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 717 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 890 बाधित रुग्ण असून 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 813 बाधीत रुग्ण असून 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 25 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 9 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 10 हजार 37 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 9 हजार 511 चा अहवाल प्राप्त आहे. 526 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 8 हजार 573 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 890 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 44 लाख 5 हजार 369 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 67 लाख 77 हजार 649 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 828 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.