विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे

  विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर

1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 700 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 896 बाधित रुग्ण असून 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 813 बाधीत रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 10 हजार 210 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे तर 507 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 264 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 896 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 865 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.