नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सम्मान पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं. योगाच्या प्रसारात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं गेल्या जूनमधे हे पुरस्कार सुरु केले.
प्रसारमाध्यमांमधल्या ३० समूहांना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यातले अकरा पुरस्कार वृत्तपत्रांमधल्या योग विषयक उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत. आठ पुरस्कार दूरचित्रवाणीवरच्या, तर अकरा पुरस्कार नभोवाणीवरच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत. योग ही भारताची जागतिक ओळख असून, ते आरोग्य रक्षणाचं उत्कृष्ट साधन आहे, असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.