पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कोवीड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाने आज महानगरपालिका क्षेत्रात पाहणी केली त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

कोवीड- १९ प्रतिबंधासाठी महानगरपालिकेच्या वतीने आधुनिक टेक्नाॅलाॅजीचा केलेला वापर सर्वांनी करावा. महापालिके मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास साथ आटोक्यात आणता येईल, असे मत केंद्र शासनाच्या पथकाचे प्रमुख व अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केले.