नवी दिल्ली : म्यानमारच्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी लियांग यांनी पंतप्रधानांना भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षात भारतात अत्यंत वेगाने विकास होत आहे याचाही त्यांनी उल्लेख केला आणि संरक्षण आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात दोन्ही शेजारी देशांमधील संबंधाच्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार केला.

या भेटीत, पंतप्रधान मोदी यांनी म्यानमार च्या आपल्या दौऱ्यादरम्यान झालेल्या स्वागताची आठवण केली. म्यानमारसोबत आतंकवाद विरोधी मोहीम, क्षमता बांधणी, सैन्यविषयक आणि सागरी सहकार्य यासह आर्थिक क्षेत्र आणि विकासात सहकार्य करत असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला

म्यानमारसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.