नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईतले सर्वाधिक ६ रुग्ण आहेत. पुण्यातले पाच, नवी मुंबई , नंदुरबार आणि धुळे इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण मृतांची संख्या २८३ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ८४०जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यात काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार, दोन व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या दहावर पोचली आहे. तर, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं बाधित आणि मयत झालेल्या सर्व व्यक्तींच्या परिवाराचे आणि त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. अमरावतीत चार कोरोनाबाधित रूग्णांना पूर्ण बरे झाल्यानं आज घरी पाठवलं आहे. रुग्णालयात दाखल या चारही रुग्णांचे रिपोर्ट उपचारानंतर निगेटिव्ह आले.
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथल्या कोरोना बाधित महिलेच्या निकट संपर्कातल्या ६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना प्रशासन कठोर पावलं उचलत आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या एकमेव कोरोना विषाणु बाधित व्यक्तीचे २० दिवसानंतरचे दोन्ही अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे या व्यक्तीला आज रुग्णालयातून घरी सोडलं जाणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना विषाणु बाधित व्यक्ती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली.
औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयातल्या सहा कोरोना विषाणुबाधित रूग्णांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे औरंगाबाद मध्ये कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या आता २२ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात १७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सहा जणांचा चौदा दिवसांचा उपचार कालावधी पूर्ण झाला असून त्यांचे अहवाल नकारात्मक आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढली असून ती १२४ वर पोचली आहे. मात्र आत्तापर्यंत ७०५ संशयीत रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहोत. तर निफाड आणि नाशिकमधले दोन रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. आतापर्यंत ९ बाधीतांचा मृत्यु झाला आहे.
एकीकडे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मिरज इथं चाचणीसाठी पाठवलेल्या सोळा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात एका सहा महिन्याच्या बाळाच्या अहवालाचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा तूर्त कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात कोरोना मुळे एकाचा मृत्यू झाला आहे.