नवी दिल्ली : वर्ध्यात हिंगणघाट इथल्या मोहता इंडस्ट्रीजनं कामगारांचं दोन महिन्यांचं वेतन थकवल्यानं जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आणि कामगार यांना कामावरून कमी करू नये. तसंच त्यांच्या वेतनात कपात करू नये असे निर्देश शासनानं एक अधिसूचना काढून दिले होते.  मात्र मोहता इंडस्ट्रीजनं लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कामगारांना वेतन देण्याबाबत चालढकल केल्यानं  भिमनवार यांनी याबाबत गुन्हा दाखल करायचे आदेश दिले.