मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून चंद्रपुर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असतांना, चंद्रपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी नागपूर-चंद्रपुरदरम्यान प्रवास केल्याचं उघड झालं आहे.
जिल्ह्याबाहेर जाताना पोलीस प्रशासनाकडून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून परवानगी घेणे बंधनकारक असताना फासे यांनी परवानगी घेतली नसल्यानं त्यांना नोटीस बजावली आहे.
या प्रकरणांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली आहे.